दिनांक२४: TCS job scam : टीसीएस (Tata Consultancy Services Ltd) ही भारतातील बड्या आयटी कंपनीपैकी एक मानली जाते. मात्र, टीसीएसमध्ये (TCS)नोकरीच्या बदल्यात लाचखोरी झाल्याचं उघड झालं आहे. जवळपास 100 कोटी रुपयांची लाच घेतली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी टीसीएस कंपनीनं चार अधिकाऱ्यांना बडतर्फ केलंय. त्यासोबतच तीन स्टाफिंग फर्म वर बंदी देखील घातली आहे. टीसीएसनं यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेय.