दि.18
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांचा तडकाफडकी पदभार जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण न देता काढून घेतला आणि एकच संतापाची लाट उसळली आहे.जिल्हाधिकारी राहुल रेखावार आपल्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नेहमीच आग्रही असतात आणि जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात.मग नाईकवाडे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्याबाबत असा तडकाफडकी निर्णय त्यांनी कसा काय घेतला याचे आश्चर्य सर्वसामान्य कोल्हापूरकर करत आहेत.स्वच्छ प्रतिमा आणि कारकीर्द असणाऱ्या नाईकवाडे यांनी अंबाबाई मंदिरात भरपूर कामे उत्कृष्ठ पणे राबविली आहेत त्यामध्ये अंबाबाई चा रथ असो,गरुड मंडप,मुख्य दरवाजा,डिजिटल प्रणाली चा वापर करून सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे बाबत दिल्ली येथे आय एफ एस ई 2022 च्या प्रदर्शनात देवस्थान समितीला पुरस्कार,निविदेतील खाबूगिरी बंद करणे असे अनेक धाडसी आणि चांगली कामे करून कित्येक वर्षांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला एक चांगला अधिकारी मिळाल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.
मग एवढे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा राजकीय बळी दिला गेला आहे का?जिल्हाधिकाऱ्यांना कोणी दबाव टाकला आहे का?याचीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.अशा पद्धतीने जर चांगल्या अधिकाऱ्यांना वागणूक मिळणार असेल तर तमाम कोल्हापूरकर गप्प बसणार नाहीत आणि याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांना ते विचारतील. शिवराज नाईकवाडे यांच्याबाबत अशी कारवाई का झाली याचा खुलासा जिल्हाधिकारी करणार का?असे कर्तव्य दक्ष अधिकारी प्रशासनाला नको असतील तर मग साड्यांचा घोटाळा करणारे अधिकारी हवेत का प्रशासनाला?चांगले काम करणाऱ्यांना कोल्हापूरकर नेहमीच डोक्यावर घेऊन नाचतात तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रसंगी काळे फासतात याची नोंद प्रशासनाने घ्यावी.याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.