भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : बेरोजगार सेवा सहकारी संस्थांसाठी ११ महिन्यांच्या करारावर कामे
प्राप्त झाली आहेत. सर्व कामे गगनबावडा व करवीर तालुक्यातील असल्याने तालुक्यातील इच्छुक व कोल्हापूर
जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कार्यरत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्रासह दि. ३ मार्च 2023 पर्यंत
प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, सी.पी. आर. येथे १ सफाई कामगार रु. ६ हजार
२५० मानधन प्रतिमहा, अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. २ येथे २ वाहन चालक प्रतिमाह प्रत्येकी १३ हजार
३३० रु. मानधन, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,
गगनबावडा मंडल क्र. ३ (इयत्ता ६ वी ते ८ वी) येथे १ चौकीदार (पुरुष) व १ सहायक स्वयंपाकी (महिला)
मानधन प्रत्येकी १० हजार ३९५ रु. प्रतिमाह, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत कस्तुरबा गांधी
बालिका विद्यालय, गगनबावडा मॉडेल क्र. ४ (इयत्ता ९ वी ते १२ वी) येथे चौकीदार (महिला) १ व सहायक
स्वयंपाकी (महिला) १ प्रत्येकी १० हजार ३९५ रु. मानधन प्रतिमाह व १ लेखापाल (महिला) प्रतिमाह १७ हजार
३२५ रु. मानधन व सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे १ सफाई
कामगार १९४.२५ रु. प्रति दिवस (सुट्टीचे दिवस वगळून) याप्रमाणे कामे प्राप्त झाली आहेत.
अटी व शर्ती -बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट २०००
नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा १९६० अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा
सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रु. ३ लाखापर्यंतची
कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी
सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक
उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ च्या
लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी, लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना देणे
आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे या सहकारी
सेवा सोसायटीतून कमी करुन त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या प्रती/प्रमाणपत्र मूळ
प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची
साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असेही श्री.
माळी यांनी कळविले आहे.