कोल्हापूर दि १३ : सातारा वनविभागाने पाटण तालुक्यातील विरेवाडी फाटा येथे चौघांना अवैध शिकारीच्या उद्देशाने वनपरिक्षेत्रात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने अटक केली. त्यांच्याकडून विळा, भाले, बांबूच्या काठ्या, वाघर (सापळा) ही शिकारीची साधने जप्त करण्यात आली.
सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे म्हणाले, “संयुक्त गस्तीदरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विरेवाडी फाटा येथे दोन संशयित संशयितपणे फिरताना आढळले. चौकशीअंती दोघा संशयितांनी आपले आणखी दोन सहकारी शिकारीसाठी पुढे गेल्याची माहिती दिली. त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांनी या दोन संशयितांनाही सापळा रचून त्यांच्याकडून शिकारीची साधने सापडली.”
अरुण बाळू सूर्यवंशी (41), नारायण जगन्नाथ सूर्यवंशी (55), लहुराज शशिकांत सूर्यवंशी (28) आणि मारुती आनंदा सूर्यवंशी (38, चौघेही रा. पाबळवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.