दिनांक १४/०९/२०२४ रोजी कसबा सांगाव, ता कागल येथील मगदुम मळा शेजारी झाडीत एका पुरुष जातीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याची माहिती पोलीस ठाणेस मिळताच कागल पोलीस ठाणेचे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी रवाना झाले. सदर इसमाचे डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप केलेला होता. त्यामुळे मयताची ओळख पटत नव्हती. तसेच घटनास्थळावरील वस्तूस्थिती वरुन सदर इसमाचा खून झालेचे निष्पन्न झाले.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर व कागल पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री गजेद्र लोहार यांना गुन्हयातील मयताची ओळख पटवून, आरोपींचा सत्वर शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या होत्या.
सदर मयताची माहिती घेतली असता, खून झालेला व्यक्ती हा पंचतारांकीत एमआयडीसी मधील रेमन्ड चौक, कागल येथील सुर्दशन जिन्स लि कंपनीमध्ये बॉयलर डिपार्टमेंट मधील कामगार असलेचे समजले व कंपनीतील कामगार रुममध्ये राहणेस होता यावरुन मृत व्यक्तीची ओळख पटविणेत यश आले व त्याचे नांव विकास सिंह सध्या रा. सुर्दशन जिन्स लि कंपनी रेमन्ड चौक,कागल मुळ गाव गोपी सिंह, ग्राम सिलवर पोस्ट गौजावर लह, मझौली, गिजवारा, सौधी राज्य मध्यप्रदेश असे असलेचे समजले.
मयत व्यक्तीचे सोबतचा कामगार विरेंद्र कुमार कुशवाह यांनी दिले फिर्यादी वरुन मयत यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी मोठया आकाराचा दगड डोक्यात घालून त्याचा खून करुन त्याचे प्रेत पुरावा नष्ट करणेचे उददेशाने मयताचे डावे पायाला नॉयलॉनची पटटी बांधून घटनास्थळावरुन शेजारील असलेल्या झुडपामध्ये टाकलेला असलेबाबत फिर्याद दिली. त्या प्रमाणे कागल पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.
त्यानंतर पथकाने परिसरातील गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध सुरु केला. त्यावेळी सदर इसमांचा शोध सुरु असताना पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना सदरचे दोन इसम हे कसबा सांगाव, ता. कागल येथील असलेची माहिती प्राप्त झाली. त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने इसम नामे १) आदिनाथ मारुती लोखंडे वय २२, मुळ रा. हळदी कांडगाव, बेघर गल्ली, ता. करवीर सध्या रा जिरगे गल्ली, कसबा सांगाव, कागल २) सुहास बाळासो बिरांजे वय ३४ रा. जिरगे गल्ली, कसबा सांगाव, कागल यांना ताबेत घेतले त्यावेळी त्याचेकडे केले चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्हयात वापरलेली एक मोटर सायकल इसम नामे सुहास बाळासो बिरांजे याची मिळून आलेने अधिक तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे.
आरोपीत नामे १) आदिनाथ मारुती लोखंडे वय २२ रा हळदी, कांडगाव बेघर गल्ली ता करवीर सध्या रा कसबा सांगाव जिरगे गल्ली. कागल २) सुहास बाळासो बिरांजे वय ३४ रा कसबा सांगाव.जिरगे गल्ली, कागल,कोल्हापूर यांना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी कागल पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग श्री सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप जाधव, शेष मोरे, जालिंदर जाधव व पोलीस अमंलदार अशोक पवार, वसंत पिंगळे, राम कोळी, आमित सर्जे, आमित मर्दाने, कृष्णात पिंगळे, राजू कांबळे, राजू येडगे यांचे पथकाने केलेली आहे.