कोल्हापूर, दि. 10 (जिमाका):, मंगळवार दि. 9 एप्रिल व गुरुवार दि. 11 एप्रिल 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. बुधवार दि. 10 एप्रिल 2024 रोजी बाहयरुग्ण विभाग सुरु राहील, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी दिली आहे.