कोल्हापूर दि २२ : फणस तर आपण सगळेजण खातो पण फणसाच्या बिया मध्ये भरपूर पोषणमूल्य आहे हे आपल्याला माहित आहे का? फणसाच्या बिया मध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे ज्यामुळे ॲनिमिया दूर व्हायला मदत होते याचबरोबर प्रोटीन सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे मॅग्नेशियम, फॉस्फरस आहे. त्यामुळे हाडे बळकट होतात. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडन्स मुळे त्वचा तरुण राहते आणि केसांची वाढ सुद्धा उत्तम होते. ज्या प्रदेशात फणस भरपूर खाल्ला जातो त्या प्रदेशातील स्त्रियांचे केस लांब, दाट असतात. मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी पूरक अशी थायामीन आणि रायबोफ्लेविन ही दोन विटामिन बी ग्रुप मधली विटामिन यात भरपूर प्रमाणात आहेत. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करणं आणि इन्सुलिनची सन सिटी वाढवणं या दोन गोष्टी फणसाच्या बिया मुळे घडतात. त्यामुळे उकडलेल्या फणसाच्या बिया स्नॅक्स म्हणून खायला काहीच हरकत नाही. स्नायू बळकट होण्यासाठी देखील फणसाच्या बिया उपयोगी पडतात. फणसाच्या बिया खा आणि सशक्त राहा..
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअरसेल्फ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक,ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
9623895866