कोल्हापूर दि 7 : 25 जानेवारी रोजी एका ज्वेलर्सकडून 15 लाख रुपये किमतीचे 250 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तीन कारागिरांना अटक केली आहे. हे तिघे गुजरी मार्केटमध्ये काम करून दुकानाच्या डुप्लिकेट चाव्या बनवत होते. पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील भोर येथील हॉटेलमधून दोघांना तर तिसऱ्या दरोडेखोराला उत्तरेश्वर पेठेतून अटक केली.