कोल्हापूर दि २५: पुणे -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल येथे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांच्या पथकाला बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारी कार समोर आली. एका पोलीस अधिका-याने सांगितले की, “वाहनात तीन लोक होते आणि आम्ही त्यांना अटक केली आहे.
प्रसाद दत्तात्रय देसाई, किरण आनंदा पोवार, सुरजित जयवंत घोरपडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते जिल्ह्यातील हुपरी शहरातील रहिवासी आहेत.