दि. ०१ ऑगस्ट २०२३:संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामध्ये आज टेलीमेडिसिन ऍप्लिकेशनच्या वापरासंदर्भात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केला. कोरोना काळात ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांपर्यंत वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचाराची सुविधा मिळण्यासाठी सुरू केलेले हे ऍप्लिकेशन अजुनही कार्यरत आहे का, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. त्यावर हे ऍप्लिकेशन अजुनही कार्यरत असून, ग्रामीण भागातील लोकांनी या ऍप्लिकेशनद्वारे मोठया प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल यांनी सांगितले. तसेच ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा ठरल्याचेही त्यांनी नमुद केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवी यांचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनंदन केले.
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या टेलीमेडिसीन ऍप्लिकेशनबाबत प्रश्न उपस्थित केला. २०२० साली आलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये डॉक्टरांना तसेच वैद्यकीय कर्मचार्यांना घराघरामध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्य विषयक सेवा देणे शक्य नव्हते. अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलीमेडीसीन ऍप्लिकेशनद्वारे आरोग्य सेवा सुरू केली. व्हॉटस्ऍप फेसबुकसह सोशल मीडियाचा वापर करत, कोरोना काळात घराघरात आरोग्य सेवा पोचवण्याचे काम झाले. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. कोरोना काळात सुरू असलेली ही सेवा सध्या कार्यरत आहे का, असा प्रश्न खासदार महाडिक यांनी उपस्थित केला. त्याला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल यांनी उत्तर दिले. कोरोना काळात सुरू केलेल्या टेलीमेडीसिन ऍप्लिकेशनद्वारे देशातील १४ कोटी १७ लाख ८१ हजार ३८४ नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला. तर तब्बल ५ लाख १५ हजार ५३० नागरिकांनी एकाच दिवशी या सेवेचा लाभ घेतला, हा एक विक्रम आहे. देशभरातील २ लाख ३५ हजार ६२ आरोग्य सेवक, १ लाख २२ हजार २१५ आरोग्य केंद्र, १३ हजार २४० हब, १ हजार १५३ ऑनलाईन केंद्राद्वारे ही योजना राबवण्यात येते. महाराष्ट्रातील ५७ लाख ३२ हजार ९५४ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये ९ लाख ५४ हजार ८३३ ज्येष्ठ नागरिक, तर ३१ लाख ६७ हजार ७९८ महिलांना या सेवेचा लाभ मिळाल्याचे एस.पी.सिंह बघेल यांनी संागितले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवी यांचे खासदार धनंजय महाडिक यांनी अभिनंदन केले.