अगोदरपासून असलेल्या ओळखीतून फोनवर अश्लील बोलून फोटो व्हायरल करण्याची धमकी देतो म्हणून काटा काढण्यासाठी रचलेल्या हनीट्रॅपचा भांडाफोड झाला आहे. कोल्हापूर पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.
कोमल कृष्णात पाटील (वय 29 रा. आकर्डे ता. पन्हाळा, इंद्रजित कृष्णात पाटील (वय 28 रा. आकुर्डे ता. पन्हाळा, नितीन पाडुरंग पाटील, (वय 32, रा.कोपार्डे ता. करवीर, मोहसिम चाँदसाब मुल्ला (वय 24, रा. कोपार्डे ता. करवीर, करण शरद रेणुके, (वय 23 रा. कोपार्डे ता. करवीर) यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेला माल, मोबाईल फोन आणि दोन हजार रुपये रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकलीसह एकूण 1 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना करवीर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.