दिनाक १७ ; श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर किंवा सोमवार, शुक्रवार ,शनिवार अशा दिवशी उपवास केला जातो. सात्विक आहार या महिन्यात घेतला जातो. मांसाहार टाळला जातो. पचन संस्थेला विश्रांती मिळावी हा यातील उद्देश आहे. हा माशांच्या प्रजननाचा काळ आहे म्हणून मत्स्य आहार टाळला जातो.
सुका मेवा,फळे , सुरण, बटाटा, रताळे असे कंद खा. दुधाचे पदार्थ म्हणजे दूध,दही,ताक ,लोणी ,तूप खावे. शिंगाडा खायला हरकत नाही. मसाल्या च्या जागी काळे मीठ , जिरे , मिरे वापरा. विकतचे बाटलीबंद फळांचे रस , चिप्स , तेलकट चिवडा , साबुदाणा वडे न खाल्लेले बरे. राजगिरा ,वरी घेवू शकता. भरपूर पाणी प्या. आणि उपवास सोडताना खूप मसालेदार , चमचमीत , अतिगोड खावू नये. तसेच उपाशी देखील राहू नये. शक्य असल्यास सोशल मीडिया पासून काही तास विश्रांती घ्या.ध्यान करा. मन स्थिर ठेवा. उपवास म्हणजे उपाशी राहणे नव्हे तर परमेश्वरा जवळ राहणे असा आहे.
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805