कोल्हापूरदि.17 – नेहमी आधुनिकता आणि नाविन्याचा ध्यास घेत संशोधन पद्धतीने कार्यरत असलेल्या डॉक्टर मयुरेश देशपांडे यांच्या अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर ने कोल्हापूरच्या मेडिकल टुरिझम क्षेत्रात दिलेले योगदान मोलाचे असून भविष्यात त्यांच्याकडून अशाच वाढत्या अपेक्षा आहेत अशा शब्दात शताब्दी वर्षात पर्दापण केलेल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण दोशी यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. जागतिक प्लास्टिक सर्जरी डे निमित्त रेसिडेन्सी क्लब सभागृहात आयोजित केलेल्या अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर च्या आजवर यशस्वी उपचार घेऊन गेलेले रुग्ण तसेच त्यांना गोल्डन अवर मध्ये रूग्णालयात पोहोचवणारे देवदूत यांच्या संयुक्त सत्कार मेळाव्यात ते बोलत होते .
या स्नेहमेळाव्यास सवाई मानसिग वैद्यकीय महाविद्यालय, जयपूर येथील ज्येष्ठ प्लास्टीक सर्जन डॉक्टर प्रदीप गोईल , डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर रणजीत मिरजे व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते दीप पूजन करून या स्नेह मेळाव्यास प्रारंभ झाला. प्रांरभी डॉ मयुरेश देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पागुच्छ देवून स्वागत केले .
गेल्या 10 वर्षात अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर च्या माध्यमातून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होऊन ब-या झालेल्या काही रुग्ण आणि समन्वयक देवदूता नी आपली मनोगते व्यक्त केले. गंभीर भाजलेल्या बालिकेला योग्य वेळी उपचारासाठी दाखल करणारे बांधकाम व्यवसायिक उत्तम फराकटे यांच्यासह बाबुराव पाटील, आसावरी माने आष्टा येथील श्री दिलीप कोडूलकर, ओंकार धुमाळ, डॉ शुभम पाटील आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अपघात किंवा अन्य कारणांनी
मानवी शरीराचे तुटलेले अवयव वेळेत उपचार केल्यास जोडता येतात.यासाठी वैधकिय विमा देखील उपयोगी पडत असल्याचे नमूद करत ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ प्रदीप गोईल यांनी पश्चिम महाराष्ट्रात आधुनिकतेची कास धरुन संशोधनासह कार्यरत अनंत प्लास्टीक सर्जरी सेंटरने अनेकांना जगण्याची नवी उमेद दिली आहे व डॉ मयुरेश देशपांडे यांचे शिक्षक आणि आत्ताचे सहकारी म्हणून आपणास विशेष अभिमान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉक्टर संदीप पाटील यांनी यावेळी बोलताना समुपदेशन आणि त्यामधून मुलांची सकारात्मकता वाढवणे हे कोणत्याही उपचारासाठी अत्यंत गरजेचे असते आणि या संदर्भाने अनंत प्लास्टिक सर्जरीने एक नवा आयाम कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात निर्माण केल्याचे नमूद केले .
यावेळी पाहुण्यां च्या हस्ते डॉक्टर शैलेश माने, डॉक्टर अभय जाधव, डॉक्टर अभिजीत मोरे, डॉक्टर स्वेणिल शहा, डॉक्टर बी एस पाटील, डॉक्टर आशिष पाटील, डॉ विक्रम गावडे, डॉ सागर पाटील, डॉ श्रीराम कुलकर्णी आदी गत दहा वर्षात वेळोवेळी मोलाचे योगदान दिलेल्या डॉक्टरांचाही अनंत परिवारातर्फे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्तावना आणि अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर चा गेल्या ९ वर्षांचा आढावा श्रीकांत नानिवडेकर यांनी कथन केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी गोखले यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ प्रियांका सावडकर यांनी केले. या सोहळ्यास कोल्हापूरातील नामवंत डॉक्टरांसह, डॉ तन्वी देशपांडे, श्री अजित वैद्य, श्रीकांत नानिवडेकर, वैभव देशपांडे आणि वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .