कोल्हापूर दि 9:दारात पडलेले भंगार साहित्य,मोडके सामान, सायकल अशा गोष्टींची लोक चोरी करत होते पण आता चोरांनी पाण्याचे मीटर सुद्धा सोडलेले नाही.
बाहेर असणारे आणि सहजगत्या चोरता येणार पितळी पाण्याचे मीटर ला आता पेटी करून कुलूप करणे गरजेचे बनले आहे.या मीटर ची किंमत अंदाजे अडीच ते तीन हजार रुपये असल्याने ते सहज पाचशे ते हजार रुपयाला विकले जाऊ शकते.कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात एका आठवड्यात 60 पाण्याचे मीटर चोरी झाल्याचे चित्र आहे.चोरटे हे सराईत असल्याने ते तोंडाला मास्क लावून चोरी करत असल्याचे काही ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.तसेच मीटर चोरून गेल्यानंतर पाणी वाहून जाऊन पाण्याची गैरसोय होऊन होणारा मनस्ताप वेगळा त्यामुळे नागरिकांनी आपल्या मीटर बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.