दिनांक ०५.०७.२०२३:आजकाल सगळीकडे गुळाचा चहा, गुळाची मिठाई असे पर्याय उपलब्ध दिसतात. गुळ आणि साखर यामध्ये नेमके चांगले काय? गुळामध्ये प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम लोह अशी पोषणमूल्य आहेत साखरेमध्ये ती नाहीत परंतु एक चमचा गुळ आणि एक चमचा साखर यामधील कॅलरीज मात्र समान आहेत. (20कॅलरीज ),गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील 84 आहे. त्यामुळे मधुमेहिनी गुळापासून लांब राहणे चांगले. गुळामध्ये देखील कार्बोहायड्रेट्स आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण गुळ खातो याचा अर्थ आपल्या शरीरात कार्बोहाइड्रेट्स जात नाहीत असा नव्हे. अर्थात गोड खायचं असेल तर साखरेपेक्षा गूळ कधीही उत्तम!
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805