दिनांक २७ ; कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व सीपीआर रुग्णालयामध्ये डिएम इंटरपाईजेस संस्थेमार्फत स्वच्छता सेवेचे काम कर्मचारी नियमितपणे करत आहेत. २०१७ मध्ये डी.एम कंपनीला निविदा मंजूर झाली होती. या निविदेची मुदत संपल्यानंतर ३१ मे २०२३ पर्यंत आम्हाला मुदतवाढ देण्यात आली होती.दरम्यान सीपीआर प्रशासनाने राबवलेल्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. याबाबत राज्य शासनाने १८ मे २०२३ रोजी अध्यादेश काढून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता यांना कळवले होते. कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व सीपीआर रुग्णालयामध्ये डिएम इंटरपाईजेस संस्थेमार्फत स्वच्छता सेवेचे काम कर्मचारी नियमितपणे करत आहेत. २०१७ मध्ये डी.एम कंपनीला निविदा मंजूर झाली होती. या निविदेची मुदत संपल्यानंतर ३१ मे २०२३ पर्यंत आम्हाला मुदतवाढ देण्यात आली होती.दरम्यान सीपीआर प्रशासनाने राबवलेल्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. याबाबत राज्य शासनाने १८ मे २०२३ रोजी अध्यादेश काढून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता यांना कळवले होते.
मागील निविदेची मुदतवाढ ३१ मे २०२३ रोजी संपल्याने आणि कोणत्याही मुदतवाढी शिवाय व नवीन टेंडरच्या वर्क ऑर्डर शिवाय सफाई कंत्राटी कर्मचारी आजपर्यंत काम करत होते. परंतु नवीन कामाची वर्क ऑर्डर मिळेपर्यंत कर्मचाऱ्यांनी शनिवार दिनांक २४ जून २०२३ पासून काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
स्वच्छता सेवेचे काम बंद केल्याने सीपीआर मधील अस्वच्छता वाढली आहे. याबाबत आज मंगळवार दिनांक २७ जून रोजी मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी डीएम कंपनी व कामगार सेनेच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा झाली. या चर्चेमध्ये मा.जिल्हाधिकारी यांनी सीपीआर मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नवीन निविदा प्रक्रियेचा प्रश्न मार्गी लावण्याची हमी दिल्याने आणि त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज दुपारनंतर सीपीआर मधील स्वच्छता सेवेचे काम सुरळीतपणे सुरू करण्यात आले आहे.यावेळी जिल्हाधिकारी यांची भेट घेतेवेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कंत्राटी स्वच्छता सेनेचे कामगार प्रतिनिधी अनिल माने,डि.एम इंटरप्रायझेस कंपनीचे सुनिता कुचणे,प्रियांका ढाणे, विमल कांबळे, लता माळगे, स्टीमन मनेर,नगमा मकानदार आदी कर्मचारी उपस्थित होते.