कोल्हापूर दिनांक २६: परवाच गडहिंग्लज मध्ये संतोष शिंदे नावाच्या उद्योजकांनी आपल्या पत्नी व मुलासहित केलेल्या आत्महत्येने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या संशयित पोलीस अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल व आत्महत्याच प्रवृत्ती केल्याबद्दल बडतर्फ करून कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मार्फत पालकमंत्र्यांच्याकडे करण्यात आली.