दिनांक२६: कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व सीपीआर रुग्णालयाने स्वच्छता सेवेची ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. जानेवारी २०२३ मध्ये राबविलेल्या या निविदा प्रक्रियेला राज्य शासनाने १८ मे २०२३ रोजी अध्यादेश काढून मंजूरी दिली आहे.नवीन निविदा मंजूर झाल्यानंतर सिपीआर प्रशासनाकडून कामाची वर्क ऑर्डर मिळणे अपेक्षित होते. याबाबत स्वच्छता कर्मचार्यांनी आणि निविदा मिळालेल्या डीएम इंटरप्रायझेस या कंपनीने सिपीआर अधिष्ठाता याना आज अखेर भेटून वारंवार लेखी व मागील निविदेची मुदतवाढ ३१ मे २०२३ रोजी संपल्याने आणि कोणत्याही मुदतवाढी शिवाय व नवीन टेंडरच्या वर्क ऑर्डर शिवाय आम्ही स्वच्छता कर्मचारी आजपर्यंत काम करत होतो परंतु आता या पुढील काळात नवीन कामाची वर्क ऑर्डर मिळेपर्यंत आम्ही काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.असे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री मा. डॉ. भारती पवार यांना सी पी आर मधील सफाई कर्मचारी यांनी आज भेट घेऊन सादर केले आहे.
तोंडी कळवले आहे परंतु त्यांनी वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली आहे.सिपीआर प्रशासनाने नवीन निवेदीनुसार वर्क ऑर्डर न दिल्याने सीपीआर मध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता सेवेचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छता कर्मचार्यांनी आपल्या हक्कासाठी नविन कामाची वर्कऑर्डर मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम सीपीआर मधील रुग्णसेवेवर झाल्यास त्याची जबाबदारी सिपीआर प्रशासनाची राहणार आहे.कृपया तरी आपन सिपीआर प्रशासनाला आदेश देवून राज्य सरकारने मंजूर केलेल्या निविदेची वर्क ऑर्डर देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अनिल चव्हाण,सुनिता कुचणे,प्रियांका ढाणे, विमल कांबळे, लता माळगे, स्टीमन मनेर,नगमा मकानदार आदी उपस्थित होते.