दिनांक २४: पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर भारतातील काही ठिकाणं तुमच्या लिस्टमध्ये नक्की अॅड करा.पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेल्या निसर्गाचा आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्हीही ही संधी सोडू नका आणि यंदाच्या पावसाळ्याच फिरण्याचा मजा घ्या.तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रपरिवारासोबत मान्सूनमध्ये फिरण्याचा आनंद घेण्याच्या विचारात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.
लोणावळा आणि खंडाळा, महाराष्ट्र : सह्याद्री पर्वतावर वसलेली लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई आणि पुण्याजवळील प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत. हिरवेगार डोंगर आणि धबधबे असलेले ही थंड हवेची ठिकाणं पावसाळ्यात अधिक सुंदर दिसतात.
शिलाँग, मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये मान्सूनमध्यो जोरदार पाऊस पडतो. यामुळे येथील हिरवागार निसर्ग, डोंगररांगा आणि धबधबे हे दृश्य पाहण्यासारखं असतं.
अलेप्पी, केरळ : व्हॅली बॅकवॉटरसाठी ओळखलं जाणारं अलेप्पी हाऊसबोट क्रूझ हे पावसाळ्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील बॅकवॉटर पूर्णपणे भरून जातं आणि आजूबाजूची हिरवळ आणखीनच हिरवीगार होते.
व्हॅली ऑफ फ्लावर्स, उत्तराखंड : उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लावर्स हे राष्ट्रीय उद्यान आहे. येथे फिरण्यासाठी मान्सूनचा हंगाम सर्वात अनुकूल आहे. या काळात ही संपूर्ण घाटी अल्पाइन फुलांनी बहरते. त्यामुळे या काळात येथील वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असते.
उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शानदार महाल, तलाव, हिरवेगार बगीचे या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल, तर पावसाळ्यात या ठिकाणाला नक्की भेट द्या.
यंदाच्या पावसाळ्यात बाहेरगावी फिरायला जाण्याआधी भारतातील या खास ठिकाणांना नक्की भेट द्या.यामुळे तुमचा मान्सूनच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित होईल.