कोल्हापूर दि 21: सीपीआर आवारात असणाऱ्या पोस्ट मार्टेम विभागात पंचनामा करण्यासाठी येणाऱ्या पोलीस बांधवांना 2 ते 3 तास थांबावे लागते.मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि पोलीस असे सर्वजण तिथे बसतात.परंतु पोलिसांना पंचनामा करून लिखाण व इतर काम करताना अडचणी येत आहेत.तिथे बसण्याचे टेबल सुद्धा बघितले तर काय अवस्था आहे हे लक्ष्यात येईल.त्यामुळे तासनतास थांबणार्या पोलिसांना चांगले टेबल आणि खुर्ची सी पी आर प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होताना दिसत आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नसल्याचे दिसून येते.