कोल्हापूर दि 12
गर्भलिंनिदान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग व पोलिस यांच्या मार्फत छापा मारून कारवाई करण्यात आली.सदरचे श्री हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभाग कार्यरत असून या हॉस्पिटलमध्ये असणारे सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे महापालिकेला खोटे सांगून गर्भलिंगनिदान चा काळा बाजार सदरच्या हॉस्पिटलमध्ये सुरू होता.पैश्याच्या हव्यासापोटी डॉ सोनल वालावलकर या स्त्रीरोग तज्ञाच्या हॉस्पिटलमध्ये असे उद्योग व्हावेत ही शरमेची गोष्ट आहे.त्यामुळे सदर कारवाई मूळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.