कोल्हापूर (प्रतिनिधी):-समृद्धी प्रकाशन स्वप्नपूर्ती फाउंडेशन जिद्द फाउंडेशन कोल्हापूर आणि वेध फौंडेशन इचलकरंजी तसेच न्यूज आखाडा निर्धार न्यूज कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आई महालक्ष्मी संमेलन कोल्हापुरात आयोजित करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या कणखर मातीत छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या श्रद्धेने विविध क्षेत्रातील व पुरोगामी समाजसेवेची परंपरा त्याचबरोबर उत्तुंग विचारधारा व्यक्तिमत्त्वांची ओळख होण्या साठी या करवीर नगरीत आई महालक्ष्मी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट अभिनेते संजय खापरे ही उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजिका पूनम मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप राक्षे आणि हे उपस्थित राहणार आहेत असे पत्रक संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात आणि स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे डॉक्टर मोहन गोखले यांनी प्रसिद्धीस दिली आहे तसेच डॉक्टर रजनीताई शिंदे वेद फौंडेशन इचलकरंजी आणि सौ गीतांजली डोंबे जिद्द फाउंडेशन कोल्हापूर हे संमेलनाचे आयक आणि नियोजक आहेत हा कार्यक्रम रविवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे होणार आहे.