कोल्हापूर दिनांक 12 – देवस्थान समितीत सुमारे 5000 साड्या पूरग्रस्तांना वाटप केल्याच्या नावाखाली त्या साड्या कोणी लाटल्या यावरून बरीच उलथापालथ झाली होती.त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी “धना-चा” कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व्यवस्थापक पदाचा पदभार काढून घेण्याचा निर्णय घेतला होता असे समजते.परंतु 5000 साड्यांचा घोटाळा होऊन सुध्दा आरोपी मोकाट असल्याचे दिसते.
“माजी व्यवस्थापकाला” आता महिन्यातून 4 ते 5 वेळा तोफ उडवण्यासाठी म्हणून सुमारे 60000 रुपये पगार दिला जातो.मग या तुंबड्या भरण्याचे काम कोणी केले आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.“हा” रोज सकाळी साडे नऊ वाजता आरतीला आपली टोळी घेऊन येतो आणि दिवसभर गायब होतो.मग याचे काम कोणी ठरवले हे समजून येत नाही.10 ते 6 ड्यूटी असताना दिवसभर “ड्यूटी गुल पगार मात्र फुल्ल” अशी गत झाली आहे.तसेच “धना” कर्मचाऱ्यांच्या वर दहशत करत असल्याचे दिसते.”माझा भाऊ समितीवर येऊ दे मग एकेकाला दाखवतो” असे म्हणून दादागिरी चालू केली असल्याचे समजते.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वर दहशत निर्माण केली जात आहे.त्यामुळे इथे काही लोक देवीपेक्षा स्वतःला मोठी समजू लागली आहेत. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नाही प्रसंगी राजकीय गुंड वापरून देवस्थान मध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यास तयार असतात.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच माजी व्यवस्थापकास कायद्याच्या बंधनात का ठेवले नाही त्यास मोकाट का सोडले? हे कळत नाही.समितीने यांना वेळीच आवर घातला नाही तर जनता एक दिवस रस्त्यावर उतरेल.