राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात
शनिवार, ७ डिसेंबरपासून १०० दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम २४ मार्च २०२५ रोजी ‘जागतिक क्षयरोग दिन’ रोजी संपणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डॉ अनिरुद्ध पिंपळे
यांनी दिली आहे.या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोगविषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे, जिल्हयातील क्षय रुग्णांना ‘पंतप्रधान क्षयमुक्त भारत’ अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे.
देशभरातील ३४७ जिल्हयामध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहीम राचविण्यात येत असून यामध्ये कोल्हापूर
जिल्हयाचा समावेश करण्यात येत आहे. या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे, निक्षय शिबीर घेण्यात येणार आहे. अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबीर तसेच स्थलांतरित, ऊसतोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यातील संशयित व्यक्तीची धुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी जिल्हा क्षयरोग केंद्र सीपीआर कोल्हापूर तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तपासणी व मोफत उपचार करण्याचे नियोजन करणेत आले आहे. याचा लाभ जनतेने घ्यावा .