खोतवाडी, तालुका हातकणंगले येथील मदारी वस्तीत 2515/1238 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामविकास कार्यक्रमातील गटारीचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे. सदर गटारीचे सांडपाणी निचरा करण्यासाठी मदिना रमजान मदारी यांच्या घराच्या भिंती लगत सिमेंट पाईप टाकण्यात आले आहे, मात्र त्या पाईपचे योग्यरीत्या जोडकाम न झाल्याने गटारीचे पाणी घराच्या भिंतीत मुरत आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गटारीचे पाणी भिंतीत मुरत असल्यामुळे घराच्या भिंतींना धोका निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे, आणि या प्रकारासाठी जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रखडलेल्या गटारीचे काम तत्काळ पूर्ण करून घराच्या भिंतींना होणारे नुकसान थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, तसेच
ठेकेदाराच्या हलगर्जीपणाची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी,
ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून गटारीचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात रमजान मदारी, रेश्मा मदारी, अल्ताफ मदारी, सलीम मदारी, मुमताज मदारी आणि अन्य उपस्थित होते.