मरळे पैकी दाभोळकरवाडी (ता .शाहूवाडी ) येथील युवा नेते दिलीप दाभोळकर (DD) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यानी रक्तदान केले.
सामाजिक कार्याची आवड असलेल्या दिलीप दाभोळकर (DD) यानी वाढदिवसानिमित्त रक्तदान हेच श्रेष्ट्दान हा नारा देत आपल्या मित्रमंडळी ला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आयोजित शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले .त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या . यावेळी दिलीप दाभोळकर यांना शुभेच्छां देण्यासाठी जि.प.कोल्हापूर चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव दादा पाटील –पेरीडकर,जि.प.सदस्य शंकर पाटील,पन्हाळा पंचायत समिती सभापती रणजीत शिंदे,युवा नेते युवराज काटकर (बाबा ) , बँक निरीक्षक भारत घाटगे,सरपंच युवराज सुतार ,सरपंच नामदेव पोवार, माजी सरपंच आनंदा पाटील ,येळवडी संस्थेचे चेअरमन रामचंद्र पाटील,चेअरमन युवराज पाटील (आबा ),काटकर पतसंस्थेचे नथुराम कुंभार ,पोलीस पाटील जगदीश पाटील,नवनाथ कुंभार –सर,अमोल काटकर –पोर्ले यांसह अनेक मान्यवरांनी भेट देउन शुभेच्छां दिल्या . रक्तदान शिबिरासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे, श्री कृष्ण सहकारी दुध संस्था पदाधिकारी व सभासद व D D प्रेमी यांचे सहकार्य लाभले .