माडग्याळ- गुड्डापूर (ता. जत) येथे वसलेली कर्नाटक व महाराष्ट्रातीव लाखों भाविकांची श्रध्दास्थान असलेली श्री दानम्मादेवीची यात्रा कार्तिक यात्रा दिनांक २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ दरम्यात भरविली जात आहे. याबाबतची माहिती श्री. दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली.
सालाबादाप्रमाणे दरवर्षी कार्तिक अमावस्येस गुड्डापूर श्री दानम्मादेवीची यात्रा भरते. यात्रेस कर्नाटकातील तसेच महाराष्ट्रातील सिमावर्ती भागातील देवीस मानणारे लाखों भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येत असतात. देवाच्या यात्रेस देवस्थान ट्रस्ट सज्ज असून भाविकांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, अन्नछत्र दासोह, निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
यात्रेस दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सुरूवात होत असून २९ ला दासोह पुजा होईल, शनिवार दि. ३० रोजी सायंकाळी दिपोत्सव व पालखीसोहळा सपन्न होईल व रविवार १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री. देवीची रथोत्सव कार्यक्रम असेल अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. यात्राच्या प्रमुख दिवशी सोलापूर चे नवनिर्वाचित आमदार विजयकुमार देशमुख व जत चे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.