28 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आयोजन : पश्चिम महाराष्ट्र मधील 230 चर्च आणि 20 हजार ख्रिस्ती बांधव होणार सहभागी
मिरज शहरात शांती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आल आहे. प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राऊंडवर 28 ते 30 नोव्हेंबर 2024 ला संजीवन सभा शांती महोत्सव 2024 चे आयोजन केले आहे. या साठी पश्चिम महाराष्ट्र मधील 230 चर्च मधील सदस्य आणि 20 हजार ख्रिस्ती बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती शांती मोहत्सव चिफ कॉर्डीनेटर पास्टर वैभव लोंढे, कम्युनिकेशन कॉर्डीनेटर पास्टर पिंटू भोरे, स्वयंसेवक कमिटी इन्चार्ज रोहित होळकर, अजित चव्हाण, संग्राम गायकवाड, अभिलाष मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिरज ख्रिश्चन चर्च डी 1 के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ ख्राईस्ट यांच्या सहभागितेतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस, वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉ.वॉन्लेस ( मिशन हॉस्पिटल ) क्रिडागंणावर दिनांक 28 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शांती मोहत्सव संजीवन सभा संपन्न होणार आहेत. सदर सभा या प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधु व बहीणींसाठी तीन दिवसीय शांती मोहत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधु आणि बहीणींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती मोहत्सव समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.