दिवाबत्ती कट्टे काढण्यास आलेल्या कामगारांना हुसकाउन दिले लावून
शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी पुन्हा मिरज सुधार समिती आक्रमक झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी दिवाबत्ती बसविण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटचे कट्टे काढण्यास सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हरकत घेत ठेकेदाराच्या कामगारांना हुसकावून लावले.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली आहे. संबंधित कामाचा ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहेत. मात्र, दुभाजकाचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत. त्यामुळे मिरज सुधार समितीने मध्यभागी दुभाजक आणि खांब बसविण्याची मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिवाबत्ती बसविण्याऐवजी अपघात होत असल्याचे कारण देत सुमारे दहा लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेले दिवाबत्तीचे सिमेंटचे कट्टे ठेकेदाराचे कामगार हटवत असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, वसीम सय्यद, राजेंद्र झेंडे यांना मिळताच त्यांनी कामाच्या ठिकाणी येऊन ठेकेदार आणि महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारत कामगारांना हुसकावून लावले.