कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत ज्या शेतक-यांना चालु (2024-25) हंगाम मधील त्यांनी पिकविलेले धान (भात) व नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायची आहे त्या शेतक-यांनी 15 डिसेंबर 2024 पर्यंत नमुद खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.
मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खालील ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु केली आहे.
आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे (अडकूर), कडगाव, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी ता. भुदरगड (दासेवाडी), राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित सरवडे तालूका राधानगरी या कार्यालयात धान (भात) व रागी (नाचणी) साठी नोंदणी सुरु आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर केंद्र -बामणी, भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी तालुका भुदरगड केंद्र कडगाव, राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित पनोरी (राशिवडे) केंद्र-चंद्रे, चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी व या कार्यालयात धान (भात) व शेतकरी विकास शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. रांगोळी, ता. हातकणंगले केंद्र गडहिंग्लज या कार्यालयात रागी (नाचणी) साठी नोंदणी सुरु आहे.
शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी 2 हजार 300 रुपये व रागी (नाचणी) करिता 4 हजार 290 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करिता शेतक-यांचा चालू (2024-25) हंगाम मधील धान (भात) व नाचणी पिकपे-याची नोंद असलेला 7/12 उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. तसेच शेतक-यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक असल्यास शेतक-यांना फोटो करीता केंद्रावर स्वतः उपस्थित रहावे लागणार आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करणे गरजेचे असुन नोंदणीकृत शेतक-यांची खरेदी करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापुर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड, कोल्हापुर येथे संपर्क करावा, असेही श्री. मगरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.