कोल्हापूर :
येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल कोल्हापूर मध्ये मतदार जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .हायस्कूलच्याविद्यार्थ्यांनी सदर बाजार मधील विविध प्रभागातून ‘मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो ‘. “मी मतदान करणारच”, ” गावाला नको, मतदानाला जा ” अशा घोषणांनी सदर बाजार प्रभाग दणाणून सोडण्यात आला. तसेच संपर्क मोहिमेतूनअनेक मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आले . ढोल ताशाच्या निनादात रॅली निघाल्याने मतदार अधिक जागृत झाले . विद्यार्थी स्वयंसेवकांनी पालकांच्या भेटी घेऊन मतदान चुकवायचे नाही त्याचबरोबर पंच्याऐंशी वर्ष पूर्ण असणाऱ्या मतदारांना घरातून मतदान करण्याची संधी असल्याचेही स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्यावतीने सांगण्यात आले .मुख्याध्यापक संजय सौंदलगे,पर्यवेक्षिका प्रमिला साजणे, क्रीडा शिक्षक सदाशिव -हाटवळ, सुरेखा पोवार, सलीम मणियार, प्रभूप्रसाद रेळेकर, नागेश हंकारे, निवेदिता पवार आदी शिक्षकांनी या अभिनयाला संबोधित केले