कोल्हापूर – विकासाचे नेमके व्हिजन असणाऱ्या महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनाच विजयी करा असे आहवान महेश राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक महेश सावंत यांनी केले . जुना वाशी नाका येथे स्वामी समर्थ भक्त मंडळ परिसरात झालेल्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते . राज्य नियोजन मंडळाच्या कॅबिनेट दर्जाचा कार्यभार सांभाळताना यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणलेला आहे तसेच तसेच महानगरपालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची ऐतिहासिक महत्त्वाची भूमिका निभावली आहे . त्यामुळे कोल्हापूरचा आगामी 25 वर्षाचा विकासाचा आलेख समोर ठेवून नियोजन करण्यासाठी धनुष्यबाणासमोरील बटन दाबावे असे आहवान त्यांनी केले .
माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी यावेळी बोलताना उपनगरातील जुन्या वसाहती मधील नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवण्यासाठी राजेश क्षीरसागर यांचे समावेत लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढू असे नमूद करत महायुती शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी – रिपाई घटक पक्ष महायुती चे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या धनुष्यबाणा समोरचे बटन दाबण्याचे आवाहन केले .या कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग आणि युवा वर्ग यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती .