बोरपाडळे (ता. पन्हाळा) विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी गावातून सायकल फेरी काढली.
विधानसभा निवडणुका २० रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्या मंदिर बोरपाडळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढली. आराध्या शेटे, आरोही समुद्रे, अनुष्का लबडे, वैष्णवी चव्हाण, राजवर्धन सावंत, सत्यजित पाटील, सोहम निकम, आयुष समुद्रे, लूक समुद्रे, कार्तिक पोतदार, अनोष चोपडे, गणेश पाटील, स्वराज कोळी, आयुष पाटील, अभिषेक शेटे या विद्यार्थ्यांनी सायकल फेरीतून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले