येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल कोल्हापूरच्यावतीने मतदार जनजागृती अभियानांतर्गत मानवी साखळी द्वारे प्रबोधन करण्यात आले यावेळी प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानवी साखळी द्वारे मतदार अभियानाचे बोधचिन्ह निर्माण करण्याबरोबरच “मी नक्की मतदान करणार” अशा आशयाच्या प्रतिकृती मानवी साखळीद्वारे निर्माण केल्या. तसेच मतदारपालकांशी संपर्क साधून संकल्पपत्राद्वारे मतदान करण्याविषयी शपथ घेतली. मानवी साखळीद्वारे आकर्षक प्रतिकृती निर्माण करण्यासाठी क्रीडाशिक्षक सदाशिव -हाटवळ, सुरेखा पोवार आणि संकल्पक नागेश हंकारे यांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि पर्यवेक्षिका प्रमिला साजणे तसेच सर्व वर्गशिक्षक यांचे या कामी सहकार्य लाभले कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, भित्ती चित्रे,फलक लेखन याद्वारे मतदार जनजागृती अभियानात आपले योगदान दिले आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर गरज पडल्यास वृद्ध आणि अपंगांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक निर्माण केले गेले आहेत अशी माहिती कोरगावकर हायस्कूल चे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी दिली . शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .