कोल्हापूर दिनांक 14 – महाविकास आघाडीचा वतीने कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ जुना बुधवार पेठ येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेला उशीर झाला असताना देखील गर्दी जशीच्या तशी होती हे आजच्या सभेचे वैशिष्ठ्य.यावेळीं सर्वांची भाषणे झाली.त्यामध्ये धनंजय सावंत यांनी आजची सभा ही ऐतिहासिक विजयाची नांदी असल्याचे सांगितले.महाविकास आघाडीच्या एकजूटीने जुना बुधवार पेठेने ही निवडणूक मनावर घेतली असून राजेश लाटकर यांचा विजय निश्चित करणारी आजची सभा असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अल्पावधीतच “राजेश दादा” ऐवजी “लाटकर यांचा “राजुभाऊ ” कोल्हापूरच्या जनतेला जवळचा वाटू लागल्याचे चित्र निर्माण होताना दिसत आहे.तसेच जुना बुधवार पेठेतून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याची मागणी करून भावी आमदार यांनी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली.या सभेला महिलांची तुडुंब गर्दी झाल्याचे दिसून येत होते.या सभेत जिल्ह्याचे नेते सतेज पाटील,राजेश लाटकर,ठाकरे गट शिवसेनेचे रविकिरण इंगवले,संजय पवार,विजय देवणे,हर्षल सुर्वे,धनंजय सावंत,सुनील मोदी,सुशील भांदिगरे ,अनिल पाटील,शशिकांत पाटील,विद्याताई घोरपडे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.