कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंबा येथे उभारण्यात आलेल्या आय.सी.जे.एस प्रणाली अंतर्गत प्रादेशिक ई-प्रिझन्स संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एन.जी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कारागृहातील सर्व कामकाज संगणकाद्वारे करण्यात येणार असल्याने त्यासाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांना आय.सी.जे.एस प्रणाली अंतर्गत प्रादेशिक संगणक प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये 51 संगणक संच कार्यान्वित करण्यात आले असून पश्चिम विभागातील प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आय.सी.जे.एस प्रणालीमधील सर्व मॉड्युल्सचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर मार्फत दिले जाणार आहे.
कार्यक्रमास वरिष्ठ तुरूंगाधिकारी चंद्रशेखर देवकर व इतर सर्व कारागृह अधिकारी, कर्मचारी व लिपीक-तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.