विधानसभा निवडणुकीच्या सज्जतेसंदर्भात ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण
कोल्हापूर, दि. 13 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसारित होणार आहे. दिलखुलास’ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणूक नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगामार्फत काटकोर तयारी करण्यात आली असून जिल्हास्तरावरील यंत्रणाही सज्ज झाली आहे. या तयारीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात विशेष मुलाखतींचे प्रसारण होणार आहे
गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची मुलाखत मुलाखत गुरुवार दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी घेतली आहे.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी संजय शिंदे यांची मुलाखत शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसारित होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक समरजीत ठाकूर यांनी घेतली आहे.