कोल्हापूर दिनांक 13 – कोल्हापूर जिल्हयामध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुक अचारसंहिता कालावधी सुरु असुन त्यामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडीत यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे यांना अंमली पदार्थ विक्री सह तसेच अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते.
त्या अनुषंगाने शाहुपूरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अजय सिंदकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे पोलीस ठाणेकडील पीसई आकाश जाधव, परिविक्षाधीन पोसई अनिकेत कुंडले, पोलीस हवालदार ४०९ संजय जाधव, मपोशि ८३ कम गराडे, पोशि ८५४ विकास चौगुले, पोशि १२४२ महेश पाटील, पोशि ६४ सुशिल गायकवाड, पोशि २४५८ सनिराज पाटील यांनी सासने मैदान परिसरामध्ये छापा कारवाई करुन आरोपी नामे १) रोहन दत्तात्रय कांबळे वय २३ २) ओंकार दत्तात्रय कांबळे वय २० दोघे रा. रेल्वे स्टेशन समोर, साईतारा अपार्टमेंट शेजारी कोल्हापूर ३) अभिजीत अजय पाटील वय १९ रा. चंदुकाका सराफ दुकानाच्या मागे स्टेशन रोड कोल्हापूर यांना अटक करुन त्यांचेकडुन २२.४२२ ग्रॅम वजनाचा एकुण ६७२६६/- रू किमतीचा एम. डी. सदृष्य अंमली पदार्थ तसेच आरोपीत यांनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, मोबाईल फोन असा एकुण एकुण २,७३,७७५/- रु किमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा सखोल तपास पोसई श्री आकाश जाधव नेम. शाहुपूरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.