कोल्हापूर जिल्हा मतदान टक्केवारीत राज्यात अव्वल येण्यासाठी हिरीरीने मतदान करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर, दि. 11 : शंभर टक्के मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारीत कोल्हापूरला राज्यात अग्रक्रमावर न्यावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. निवडणूक आयोग आणि भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयातर्फे कोल्हापूर मध्ये मतदार जागृती अभियानाची आज सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शाहीर रंगराव पाटील यांच्या कला पथकाने आपल्या पोवाड्याद्वारे उपस्थितांना खिळवून ठेवले.
याप्रसंगी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली.
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे.राज्यातील प्रत्येक मतदार नागरिकांनी न चुकता मतदान करावे, यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.