कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावर दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पन्हाळा पोलिसांच्या तपासाला आता सामोरे जावे लागत आहे. दीपावलीनिमित्त व निवडणुकी संदर्भात पन्हाळगडावर शाहूवाडी विभागीय उपधीक्षक आप्पासो पवार यांच्या आदेशानुसार पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांनी पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या व अन्य प्रवासांच्या गाड्या अडवून तपासणी सुरू केली असून यामध्ये गाडीचे पेपर ड्रायव्हिंग लायसन व गाडीच्या डिकी ची तपासणी केली जात आहे. दिवाळीच्या सणावर कोणत्याही प्रकारचा अनिश्चित प्रकार घडू नये या कारणासाठी हा बंदोबस्त तैण्यात करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंबले यांच्याकडून सांगण्यात आले आहे..