धर्मावर धर्म घासतात, ठिणगी पडली की, त्या आगीवर राजकीय पोळ्या भाजतात :-
भाजपाने पहिला संकल्पना आणली वन नेशन वन टॅक्स, त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन आणि आता वन नेशन वन पार्टी हा त्यांच्या प्रमुख अजेंडा आहे, आणि याचाच अर्थ या देशात दुसरी पार्टी ठेवायचीच नाही हा भाजपचा मोठा प्लॅन आहे, असं सांगून नितीन बानगुडे पाटील पुढे म्हणाले, लोकसभेच्या वेळी संविधान बदलणार असा न्यारेटीव्ह आपण सेट केला अशी टीका भाजपकडून होत आहे, मात्र तो न्यारेटीव्ह नव्हता तर ती वस्तुस्थिती होती, असही नितीन बानगुडे पाटील यांनी यावेळी सांगितलं.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे, उ बा ठा शिवसेना नेते चंद्रहार पाटील, उ बा ठा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते,बजरंग पाटील, काँग्रेसचे नेते सदाशिव खोत, राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे, अभिजीत हारगे,बाळासाहेब भंडारे, चंद्रकांत मैंगुरे, माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, दिनकर पाटील, विषालसिंह राजपूत, चंद्रकांत मैगुरे,महादेव हुलवान,सौ .संगीता हारगे, स्मिता पाटील, निता आवटी, सोनाली भोसले,मनीषा पाटील,शाकिरा जमादार,सुहाना नदाफ यांच्यासहित महाआघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते