सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. श्री श्रीनगर राजेवाडी या कारखान्यावरती दीपावलीच्या निमित्त झालेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चेअरमन एन शेषागिरी रावसर व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवरपाटील यांचे शुभ हस्ते व जनरल मॅनेजर राव तसेच कोकरे सर यांचे उपस्थितीमध्ये व प्रभाकर केसकर यांच्या पुरोहितत्तयातून धार्मिक पद्धतीने व विधियुक्त असे श्री लक्ष्मीपूजन थाटात व फटाकेच्या आतषबाजी मध्ये आणि अनेक प्रकारच्या पुष्प वृष्टीने संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आली.