कोल्हापूर दिनांक 31 – कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच ऊत आला असल्याचे दिसते.नाही म्हणता म्हणता मधुरीमाराजे यांच्या उमेदवारीने डावात रंगत आणली आणि फासे उलटे फिरायला सुरू झाले.शिवसेना शिंदे गटाला सहज सोपी वाटणारी निवडणूक थोडी टफ निर्माण झाली तरीसुद्धा शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी प्रचाराचा बराच प्रवास पूर्ण केल्याचे चित्र असताना सुध्दा त्यांनी काँग्रेसच्या नाराज घटकांना आपल्यासोबत घ्यायला व्यूहरचना रचायला सुरुवात केली आणि त्याला यश मिळताना दिसत आहे.काँग्रेसच्या माजी आमदार जयश्री जाधव शिंदे गटात सामील झाल्या अन् पारडे जड झाले.त्यामुळे काल परवा पर्यंत राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळते की नाही याबद्दल काळजीत असणारे त्यांचे समर्थक आज “लीड किती मिळणार” याचा अंदाज बांधताना आनंदात दिसत आहेत.त्यामुळे राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाच नसतो गरज असते ती फक्त सावध राहण्याची.यापूर्वी निवडणुकीत रात्रीतून घडामोडी व्हायच्या मात्र आता त्या दिवसाच होऊ लागल्याने “रात्रीस खेळ चाले” बंद होऊन दिवसाच खेळ चाले असे झाल्याचे दिसत आहे.तसेच आता अजून कोण कोण गळाला लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.तसेच महाविकास आघाडी कम बॅक करणार का?याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.