रुकडी येथे रामेश्वर नगर मध्ये श्री अरुण शिवा लोखंडे हे आपल्या परिवारासह राहतात. काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे ते मुलीला पाहण्यासाठी गेले असता व त्यांचा मुलगाही रेल्वे पोलीस विभागात असल्यामुळे तोही कामानिमित्त बाहेरगावी होता . या वेळेचा गैरफायदा घेऊन. चोरट्याने चोरी केली.
शेजारी राहत असणाऱ्या गायकवाड कुटुंबांना कुलूप उघडे असलेले दिसल्यामुळे त्यांना शंका आली. आणि सदर चोरीची घटना उघडकीस आली
या चोरीमध्ये रोख रक्कम दोन लाख 80 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक मंगळसूत्र, एक लेडीज अंगठी, एक सोन्याची चैन असा मुद्देमाल चोरीस गेला आहे,
सदर चोरीच्या घटनेची नोंद हातकलंगले पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या घटनास्थळी जयसिंगपूर डी.वाय.एसपी हातकलंगले पोलीस स्टेशन पी.आय तसेच एपी.आय ,पोलीस स्टाफ आणि डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी भेट दिली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस स्टेशन करत आहे