जैनापूर (ता. चिकोडी) येथील अरिहंत शुगर कारखान्याचे 2024-25 सालात चार लाख टन ऊस गाळपाचे ध्येय असून शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची हमी आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या जमीनी ओलीताखाली आणण्यासाठी लवकरच योजना राबविण्याचा विचार सुरु आहे. गेली सहा वर्षे केवळ शेतकऱ्यानी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरत या भागातील इतर कारखान्याच्या बरोबरीने शेतकऱ्यांना योग्य दर दिला आहे. यंदाही सरकारच्या घोषणेप्रमाणे ऊसाला दर दिला जाणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
ते जैनापूर येथे अरिहंत साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करून बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अभिनंदन पाटील व मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी घालुन दिलेल्या नीती नियम व मार्गदर्शनाखाली मी व माझे बंधू अभिनंदन पाटील विविध कार्यात सहभागी आहोत. त्यामुळे अरिहंत परिवाराचा हळूहळू मोठा विस्तार होत चालला आहे. यासाठी सर्व सदस्य, शेतकरी, ऊस उत्पादक, कारखान्याचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे. यापुढेही सामाजिक, धार्मिक, सहकार कार्यासह, शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊले उचलणार आहोत. आपल्या कारखान्यात केवळ ऊस गाळप करुन साखर तयार केली जाते. तरी एफआरपीच्या बरोबरीने यंदाही इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला दर देणार आहे. त्यासाठी या भागातील कारखान्याला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रा.सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, दत्त शुगरचे संचालक इंद्रजीत पाटील, मीनाक्षी पाटील, दिपाली पाटील, अरुण देसाई, शाम रेवडे, ठेकेदार रवी माळी, युवराज पाटील, धनश्री पाटील, निरंजन पाटील, प्रकाश पाटील, पिरगोंडा पाटील, सीईओ आर. के. शेट्टी, अभिजीत पाटील, संजय पाटील, सतीश पाटील, केदार कुलकर्णी, दिग्विजय पाटील, संदीप पाटील, सुहास चौगुले, सचिन बिंदगे, आदिनाथ गिजवणे यांच्यासह, कारखान्याचे सर्व संचालक, बोरगावचे नगरसेवक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.