कोल्हापूर, दि.24 : 274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात (Static Serveillance Team) स्थिर सर्वेक्षण पथकाने शाहु टोलनाका, उजळाईवाडी येथील चेकपोस्टवर पथक क्र. 8 पथक प्रमुख सुशांत शिरतांडे यांनी दि. 23 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.50 वाजता वाहन तपासणी दरम्यान इनोव्हा वाहानामध्ये रोख रक्कम 6 लाख 94 हजार रुपये जप्त केले असून ही रक्कम जिल्हाकोषागार कार्यलय येथे सिलबंद करुन ठेवण्यात आली आहे, अशी माहिती 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी करवीर हरिष धार्मिक यांनी दिली आहे.