सांगली सातारा सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजेवाडी (श्री श्रीनगर) येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामाच्या बॉयलर प्रदीपन समारंभाचे आयोजन सद्गुरु श्री. श्री. साखर कारखान्याचे चेअरमन मा. शेषागिरी रावसर यांचे शुभहस्ते व व्यवस्थापकीयसंचालक उदय जाधव, संचालक मोहन बागल, सो उषाताई मारकड यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजन केले होते. प्रथमता श्री कापरे गुरुजी यांनी धार्मिक विधी व पौरोहित्य केले. त्यानंतर मा. चेअरमन एन. शेषागिरी रावसर यांचे हस्ते व राजेवाडीचे लोकनियुक्त सरपंच कैलास शिरकांडे, मा. कांतीलाल नाईकनवरे, तसेच जनरल मॅनेजर मा रेड्डी सर, मा. हरिबाबु, एच आर एन एडमिन सचिन खटके, सर्व खाते प्रमुख तसेच सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील असंख्य सभासद बांधव वाहन चालक मालक यांचे समवेत अतिशय उत्साहाने चालू वर्षीच्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रतिपन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कारखान्याची संपूर्ण माहिती केन मॅनेजर सुनील सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. तर मा. उदय जाधव सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थित शेतकरी बांधव व सभासदांना कारखान्याची सर्व पार्श्वभूमी ते आत्तापर्यंतच्या वाटचालीबाबत इथंभूत प्रगती सांगितले व आपल्या सर्व एकनिष्ठ सभासद सभासद बांधवांना दीपावली निश्चितपणे गोड होईल या पद्धतीचा निर्णय आपला सद्गुरु परिवार घेणार आहे अशी खात्री दिली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा. एन शेषागिरी रावसर यांनी आपल्या या कारखान्याच्या जडणघडणीमध्ये सर्व संचालक मंडळ ,सभासद ,शेतकरी बांधव, वाहन चालक मालक, सर्व खाते प्रमुख, कामगार कर्मचारी या सर्वांनीच आत्तापर्यंत जे सहकार्य दिलेल आहे त्यामुळे आपण प्रगतीकडे वाटचाल करीत आहोत त्याप्रमाणेच भविष्यात सुद्धा सहकार्य करा असे आव्हान करून सर्वांना धन्यवाद दिले. सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी केले तर आभार कोळेकर साहेब यांनी मानले. सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.