कोल्हापूर- मोबाईलवर तलवारीचा स्टेटस ठेऊन दहशत माजविणारया उत्तम मारुती कांबळे (वय.27.रा.घुंगूर ता.शाहुवाडी. )आणि प्रविण दौलत लोखंडे (वय20.रा.आमिनी ता.शाहुवाडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून 3 तलवारी आणि यामाहा मोटारसायकल असा एकूण एक लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरोधात शाहुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अवैद्य हत्यार बाळगून विक्री करण्यारया इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या. या अनुशंगाने माहिती घेत असताना घुंगूर ता.शाहुवाडी येथील दोघां जणांनी तलवारीचा स्टेटस ठेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली .तसेच स्टेटसला ठेवलेली तलवार ही मोटारसायकलला बांधून घुंगूर ता.शाहुवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील 3 तलवारी आणि यामाहा मोटारसायकल जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक जालिंदर जाधव, ,पोलिस सागर चौगुले ,सुरेश पाटील ,विनोद कांबळे ,अशोक पोवार, युवराज पाटील,अमित सर्जे ,यांच्यासह आदीने केली.