कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या महाविकास आघाडीचा अखेर निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.त्यामुळे आता मधुरीमाराजें आता उत्तरच्या रिंगणात येत असल्याचे खात्रीलायक माहिती भन्नाट न्यूज ला मिळाली आहे.याबाबत काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी जिल्ह्याचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.परंतु याबाबतची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता कोल्हापूर उत्तर मध्ये राजेश क्षीरसागर विरुद्ध मधुरीमाराजे असा सामना रंगणार असे दिसते.त्यामुळे उत्तरची उत्कंठा शिगेला पोचली असून यावर उद्या शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सूत्रांकडून समजते.