कोल्हापूर दिनांक 23 – सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक – 2024 अनुषंगाने पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडीत यांनी तसेच अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, कोल्हापूर यांनी पोलीस | निरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध दारु, जुगार, हत्यारे यांचेवर कारवाई करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, यांनी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारचे गुन्हे | उघडकीस आणणेकरीता बातमीदार यांचे मार्फत उपयुक्त माहिती मिळवून उघडकीस | आणलेबाबत सुचना व मार्गदर्शन केलेले होते. आज दि.23.10.2024 रोजी पोलीस निरीक्षक, दिलीप पवार यांना पापाची तिकटी, कोल्हापूर याठिकाणी एक इसम बेकायदेशीर हत्यारे विक्री करता घेवून आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी बातमीच्या अनुषंगाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील | पोहेकॉ /प्रितम मिठारी, पोहेकॉ/ गजानन परीट, पोकॉ/मंगेश माने, पोकों/ तानाजी दावणे, , पोकों/ किशोर पवार मपोहेकॉ / वृंदा इनामदार, मपोकों/ माधवी खाडे, चालक पोकों/अमित पाटील, असे पथक तयार करुन रवाना केले. नमुद पथकास पापाची तिकटी, कुंभार गल्ली जाणारे रोडवर एक इसम संशयीतरित्या हातात प्लॉस्टीक पोते घेवून उभे असल्याचा मिळून आला. सदर इसम नामे शामराव सदाशिव चव्हाण, वय-44 वर्षे, रा. घर नंबर-259, ई-वॉर्ड कनाननगर, शाहुपुरी कोल्हापूर याच्या ताब्यात मिळून आलेल्या पोत्याची नमुद पोलीस पथकाने पंचासमक्ष झडती घेता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 16200/- रुपये किंमतीचे 61 धारदार | कोयते व सु-या मिळून आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने नमुद इसमा विरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर- /2024, द भारतीय हत्यार कायदा कलम 5,7,27 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
,
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पोवार पोहेकॉ /प्रितम मिठारी, पोहेकॉ/ गजानन परीट, पोकों/मंगेश माने, पोकॉ/ तानाजी दावणे, पोकॉ/ किशोर पवार, चालक पोकों/अमित पाटील, मोहेकॉ/ वृंदा इनामदार, | माधवी खाडे यांनी केलेली आहे.